TET मराठी अलंकार सराव प्रश्नसंच tet practice questions
1. आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा.
1) दृष्टांत अलंकार
2) श्लेष अलंकार
3) रुपक अलंकार
4) अनन्वय अलंकार
2. एखादया विषयाचे वर्णन करुन झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो ?
1) रुपक
2) अनन्वय
3) दृष्टांत
4) व्यतिरेक
3. ‘आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे’ अलंकार कोणता?
1) अनुप्रास अलंकार
2) अतिशयोक्ती अलंकार
3) उपमा अलंकार
4) दृष्टांत अलंकार
4. ‘तिचा चेहरा जणूकाय चंद्रच’ या वाक्याचा अलंकार ओळखा.
1) उत्प्रेक्षा अलंकार
2) यमक अलंकार
3) विरोधाभास अलंकार
4) अनुप्रास अलंकार
5. पुढील पद्मपंक्तीतील अलंकार ओळखा.
मुंगी उडाली आकाशी। तिने गिळिले सुर्यासी ॥
1) रूपक अलंकार
2) श्लेष अलंकार
3) अनुप्रास अलंकार
4) अतिशयोक्ती
6. पुढील पंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे?
मी डोळस असूनही आंधाळा हाय करंटा।
ऐकून जरी गंभीर वाजे घंटा ।।
1) विभावना
2) विशेषोक्ती
3) विरोधाभास
4) असंगती
7. खालील वाक्यात उपमान कोणते ?
‘मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता’.
1) मोहन
2) घोडा
3) वेग
4) सारखा
8. सम, समान, प्रमाणे, परिस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात ?
1) यमक
2) रुपक
3) उत्प्रेक्षा
4) उपमा
9. ‘दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते’ अंलकार ओळखा.
1) अनन्वय
2) अतिशयोक्ती
3) उपमा
4) रुपक
10. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार प्रकार ओळखा.
1) उपमा
2) रूपक
3) अनन्वय
4) व्यतिरेक
11. दमडीच तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झाल, मामंजीची दाढी झाली, हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे?
1) स्वभावोक्ती अलंकार
2) अतिशयोक्ती अलंकार
3) दृष्टान्त अलंकार
4) भ्रांतिमान अलंकार
12. खालील ओळी वाचा व अलंकार ओळखा
१) उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते
२) उपयेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपयामेचीच उपमा द्यावी लागते.
ही कोणत्या अलंकाराची वैशिष्टये आहेत.
1) अनन्वय अलंकार
2) अपन्हुती अलंकार
3) अतिशयोक्ती अलंकार
4) अर्थान्तरन्यास अलंकार
14. पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.
‘गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले’
1) यमक अलंकार
2) श्लेष अलंकार
3) अनुप्रास अलंकार
4) यापैकी नाही
15. सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।।
या वाक्यातील अलंकार ओळखा.
1) यमक
2) उपमा
3) उत्प्रेक्षा
4) श्लेष
17. ‘दूर देशी राहिलेले दिन त्याचे झोपडे. बापूडा अन् आज येथे पायवाटेला पडे’ या पंक्तीतील अलंकार ओळखा?
1) चेतनागुणोत्की
2) अन्योक्ती
3) स्वभावोक्ती
4) पर्यायोक्त
18. ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
1) रुपक
2) उपमा
3) श्लेष
19. अलंकार ओळखा.
देह देवाचे मंदीर। आत आत्मा परमेश्वर ।।
1) अनन्वय
2) व्यतिरेक
3) रुपक
4) अनुप्रास
20. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी। राजहंस दोन्ही वेगळाली ॥ तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। येरागबाळाचे काम नोहे ॥
वरील काव्य रचनेतील अलंकार ओळखा
1) रूपक
2) अतिशयोक्ती
3) दृष्टांत
4) विरोधाभास
21. ‘हृटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि का शिरी, मठाची उठाठेव कां तरी।।’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे
1) व्यतिरेक
2) अर्थश्लेष
3) अनुप्रास
4) अंत्ययमक
22. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या उदाहरणाचा अलंकार ओळखा.
1) उत्प्रेक्षा
2) उपमा
3) रूपक
4) दृष्टांत
23. खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे?
1) शब्दालंकार
2) वाक्यालंकार
3) अर्थालंकार
पर्याय 1 व 3
24. जो अंबरी उफळता खुर लागलाहे । तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ।।
या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा?
1) उपमा
2) अतिशयोक्ती
3) उत्प्रेक्षा
4) रुपक
25. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रखा। ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार। या पदय पंक्तीतील अलंकार ओळखा.
1) उपमा
3) उत्प्रेक्षा
2) दृष्टांत
4) अतिशयोक्ती
27. अरे वेड्या सोनचाफ्या। काय तुझा रे बहर। या पंक्तीतील अलंकार ओळखा.
1) अतिशयोक्ती अलंकार
3) विरोधाभास अलंकार
2) चेतनागुणोक्ती अलंकार
4) सार अलंकार
28. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ या
वाक्यातील अलंकार ओळखा.
1) श्लेष
2) अनुप्रास
3) उपमा
4) यमक
30. आईसारखी आईच
1) दृष्टांत अलंकार
2) श्लेष अलंकार
3) रूपक अलंकार
4) अनन्वय अलंकार
32. पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे? कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरुन कोणी, जवळुन वार केला ॥
1) दृष्टांत
2) यमक
3) उपमा
4) श्रेष
33. मराठी व्याकरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेंव्हा. होतो. हा अलंकार
1) अनुप्रास
2) श्लेष
3) उपमा
4) उत्प्रेक्षा
35. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
नयनकमल हे उपडित हलके जागी हो जानकी।
1) व्यतिरेक
2) अनुप्रास
3) अनन्वय
4) रूपक










