राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक आयोजित करणेबाबत state level online meeting
महोदय,
मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२ जून, २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सोबत जोडलेल्या विषय सूचीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक Video Conference द्वारे घेण्यात येणार आहे.
सदर बैठकीसाठी क्षेत्रिय अधिकारी यांनी स्वतंत्रपणे पुरविण्यात येणाऱ्या ऑनलाईन लिंक द्वारे उपस्थित रहावे. सदर बैठकीसाठी तालुका स्तरावरील शिक्षण विषयक कामकाज पाहणारे अधिकारी यांना शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणेबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी सूचना याव्यात, सदर बैठकीसाठी आयुक्त (शिक्षण) यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे कडून ऑनलाईन लिक तयार करून घेऊन सर्व संबंधितांना पाठविण्याची व सर्व संबंधितांना बैठकीस उपस्थित राहणेबाबत त्यांच्या स्तरावरून सूचित करावे ही, विनंती.
सोबत वरील प्रमाणे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) व शिक्षण विभाग अधिकारी संयुक्त बैठक.
१. शाळा प्रवेशोत्सव नियोजन
२. शालेय गणवेश उपलब्धता
३. पाठ्य पुस्तके वितरण
४.पी.जी.आय. (Performance Grading Index) बाबत विशेष लक्ष देणे.
५. शाळा व परिसर स्वच्छता
५.१. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, शाळा इमारत रंग रंगोटी, पिंक रुम,
५.२. वर्ग खोली दुरुस्ती/बांधकाम
५.३. डी.पी.डी.सी., गौण खनिज, जि.प.सेस व इतर निधीतून प्राधान्याने
६. सीएसआर निधीसाठी जिल्हयातील प्रमुख उद्योजकांच्या मदतीने शाळेचा भौतिक विकास करणे.
७. जिल्हा व तालूका स्तरावरील सर्व वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी यांना जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगरपालिकेच्या शाळा दत्तक देणे
८. शाळा व विद्यार्थी सुरक्षा योजना यांची प्रभावी अंमलबजावणी, प्रवास व्यवस्था, एकल पालक हेल्थकार्ड
९. अंगणवाडीचे वर्ग जि.प. शाळेय आवारात सुरु करणे
१०. आयडॉल शिक्षक यांच्या मदतीने परिसरातील इतर शाळांमध्ये नाविण्यापूर्ण उपक्रम राबविणे
११. शिक्षण पर्यटन उपक्रम प्रभावि अंमलबजावणी
१२. निपूण महाराष्ट्र अंतर्गत जून ते सप्टेंबर या कालावधीत लेखन, वाचन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
१३. राणी लक्षमीबाई आत्मरक्षा अभियान, देशभक्तीपर कवायत व योगा संचलन प्रबोधन प्रभावी राबविणे
१४. प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागावरील नामफलकावर मोठ्या अक्षरात शाळेचा युडायस क्रमांक व योजना लिहिणे बंधनकारक करणे
१५. मान्यता नसलेल्या बोगस शाळांची नावे प्रसार माध्यमांमधून प्रसिध्द करणे, सदर शाळे बाहेर शाळेस मान्यता नाही असा फलक लावून पालकांमध्ये जागृति करणे व संबंधित शाळा बंद करणे
१६. पवित्र पोर्टल भरती, पदोन्नती संदर्भातील निर्णय तात्तडीने घेण्यात यावेत, शिक्षक भरती नोंदणी करावी
१७. शाळा व्यवस्थापन समिती
१८. ११वी, १२ वी Face reading कॉमेरे / Classes साठी / college साठी.









