बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग २’ या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील ‘माहीत आहे का तुम्हांला?’ या चौकटीबाबत शुद्धिपत्रक balbharti shuddhipatrak
विषय :
बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग २’ या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील ‘माहीत आहे का तुम्हांला?’ या चौकटीबाबत…
इयत्ता तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग २ पाठ्यपुस्तकातील पुष्ठ क्र. १५ वरील ‘माहीत आहे का तुम्हांला ?’ या चौकटीत ‘ही महाराष्ट्रातील पहिली मुर्तीची शाळा होय.’ या वाक्याच्या ऐवजी ‘ही महाराष्ट्रातीलब नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय.’ असा बदल करण्यात येत आहे.
सदर बदल शालेय स्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित व इतर सर्व अनुषंगिक घटकांच्या निदर्शनास आणावा. या संदर्भातील कार्यवाहीच्या सूचना त्यांना देण्यात याव्यात. सदरचे शुद्धिपत्रक हे पाठ्यपुस्तक मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.











