पवित्र पोर्टल उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025) pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025) pavitra portal shikshak bharti 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या

रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत

१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १७०१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.

A) दिनांक ०८/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय – ६०८१२, मुलाखतीसह – ३९६५५

B) आज दि. ०९/०८/२६ रोजी सकाळी ८:०० वा. मुलाखतीशिवाय – ६५१६३, मुलाखतीसह-४५४९०

C) आज दुपारी १२:०० वाजता मुलाखतीशिवाय-७०१९८, मुलाखतीसह – ४५४९०

D) आज दुपारी ०४:३० वाजता मुलाखतीशिवाय-७५१५०, मुलाखतीसह ५४९०६

E) आज सायं. ०६:०० वाजता मुलाखतीशिवाय-७६३९४, मुलाखतीसह – ५६२०६ वरील प्रमाणे उमेदवारांना प्राधान्यक्रम पोर्टलवर जनरेट झालेले आहेत.

२. संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक ११/०८/२०२६ ऐवजी १३/०८/२०२६ अशी वाढविण्यात येत आहे.

त्यामुळे उमेदवारांनी सदर वाढलेली मुदत लक्षात घेऊन प्राधान्यक्रम लॉक करावेत.

३. पोर्टलवर उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी अथवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी Otp आवश्यक आहे, यासाठी Otp वर क्लीक केल्यानंतर Otp लगेच येतो परंतु मोट्या प्रमाणात उमेदवार लॉगिन करत असल्याने Otp लगेच येत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे Otp न आल्यास काही काळ otp येण्यास वाट पाहावी, लगेच Resend यावर क्लीक करू नये. Otp उशिराने आला तरी Otp स्वीकारण्यात येतो त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नाही. काही काळापर्यंत Otp न आल्यास पुन्हा Otp बटन समोरील Resend वर क्लीक करून Otp मिळवता येईल.

४. ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या Browser ची History / Cache clear करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास Incognito Window (Private Window) चा वापर करावा.

५. आदिवासी विकास विभागाकडील उच्च माध्यमिक विभागाच्या विज्ञान शाखेचे Biology, Chemistry, Physics & Mathematics या विषयाचे प्राधान्यक्रम इंग्रजी माध्यमातील उमेदवार यांना संबंधित विभागाचे पत्र दिनांक ०८/०८/२०२६ अन्वये उपलब्ध करण्यात येत आहेत याची संबंधीत उमेदवार यांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment