संच मान्यता सन २०२६-२७ बाबत sanchmanyata paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संच मान्यता सन २०२६-२७ बाबत sanchmanyata paripatrak 

उपरोक्त विषयान्वये सन २०२६-२७ च्या ऑनलाईन संच मान्यता दिनांक ३०/०९/२०२६ रोजीच्या नोंद असलेल्या व आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे केल्या जाणार असल्याचे आपणांस यापूर्वी पत्र, Online VC, भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून कळविण्यात आले आहे.

संच मान्यता साठी विद्यार्थी माहिती भरताना Division Aid, Medium, Stream, Inactive Division Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक आहे. सदर बाबी अचूक नसल्यास संबंधित शाळेची संच मान्यता Generate होऊ शकत नाही किंवा जितक्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य आहे तितके विद्यार्थी ग्राह्य धरून संचमान्यता Generate होते. त्यामुळे सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या संचमान्यता दिनांक ३०/०९/२०२६ च्या नोंद असणाऱ्या पटानुसार माहे ऑक्टोंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्गमित करावयाचे असल्याने वरील सर्व माहिती दिनांक ३०/०९/२०२६ पूर्वी बरोबर असल्याची खात्री करून शाळा स्तरावरील विद्यार्थी माहिती दिनांक १/१०/२०२६ रोजी वर्ग करण्याबाबतची कार्यवाही करावी.

सदर बाबतीत कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच आपल्या स्तरावरून माहिती सादर करण्यास विलंब झाल्यास व त्यामुळे संच मान्यता Generate न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ज्या स्तरावर माहिती सादर करण्यासाठी विलंब झाला आहे त्यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच आपल्या स्तरावरून गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व सर्व संबंधित मुख्याध्यापक यांनायांना तात्काळ निर्देश द्यावेत.

Related posts:

Leave a Comment