विशेष सखोल पुनरिक्षण (SIPA) अंतर्गत नमुना- ६, ७ व ८ ची माहिती देणेबाबत Special Intensive Revision
महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दिनांक ३१.०८.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी दिनांक १२.१०.२०२६ वरुन दिनांक २६.१०.२०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. यानुषंगाने, दिनांक ३१.०८.२०२६ ते १२.१०.२०२६ या कालावधीत मतदारांकडून सादर करण्यात आलेल्या नमुना- ६, ७ व ८ चा आढावा घेण्यात येत असून, ऑनलाईनद्वारे सादर करण्यात आलेल्या नमुन्यांची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध होते. परंतु, ऑफलाईनद्वारे सादर केलेल्या नमुन्यांची माहिती संबंधित अर्ज Digitized करेपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होत नाही. यास्तव, दिनांक ३१.०८.२०२६ ते १२.१०.२०२६ या कालावधीत ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या नमुना- ६, ७ व ८ ची खालील प्रपत्रातील अचूक माहिती दिनांक १४.१०.२०२६ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत या कार्यालयास eroll-election@nic.in या ईमेलवर अथवा व्हॉटसअॅपवर उपलब्ध करुन द्यावी, ही विनंती:-
तद्नंतर, वरीलप्रमाणे नमुना ६, ७ व ८ बाबतची साप्ताहिक माहिती (दि.१९.१०.२०२६ व दि.२६.१०.२०२६ पर्यंतची) या कार्यालयास सादर करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्यावी.











