दीक्षा पोर्टलवरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला अंतिम मुदतवाढ देणेबाबत diksha portal ai sathi course 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दीक्षा पोर्टलवरील “शिक्षकांसाठी AI साथी” या ऑनलाईन कोर्सला अंतिम मुदतवाढ देणेबाबत diksha portal ai sathi course 

संदर्भ : CIET-NCERT यांचे पत्र, दि. ०६/०७/२०२६.

उपरोक्त संदर्भानुसार राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी “शिक्षकांसाठी AI साथी” हा ऑनलाईन कोर्स दीक्षा (DIKSHA) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कोर्स साठी आत्तापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होते. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा यासाठी उपरोक्त संदर्भ पत्रामधील निर्देशानुसार, या कोर्सच्या कालावधीस अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील :

कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अंतिम दिनांक

२० मार्च २०२७

कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम दिनांक

३१ मार्च २०२७

त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या ज्या शिक्षकांनी अद्याप सदर कोर्समध्ये प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी कोर्समध्ये प्रवेश घेवून आणि ज्या शिक्षकांनी अगोदरच प्रवेश घेतलेला आहे त्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत कोर्स पूर्ण करावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

Digitally signed by Jyoti Balasaheb Shinde Date: 04-11-2026 12:38:56

(ज्योती शिंदे)

उपसंचालक, आयटी व प्रसार माध्यम विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. मा. संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. मा. संचालक, योजना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Related posts:

Leave a Comment