प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) १, मुंबई व प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) २ नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार, उप कोषागार कार्यालयांसाठी e-GPF कार्यप्रणाली सुरु करण्याबाबत egpf pranali 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) १, मुंबई व प्रधान महालेखापाल कार्यालय (ले. व अ.) २ नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि सर्व जिल्हा कोषागार, उप कोषागार कार्यालयांसाठी e-GPF कार्यप्रणाली सुरु करण्याबाबत egpf pranali 

वाचाः १. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. साप्रवि- २०१९/प्र.क्र. ६१/का-२४. दि.११.०६.२०२०.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. साप्रवि २०१९/प्र.क्र. ६१/का-२४, दि. २४.०९.२०२०.

३. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.५५/कोषा-प्रशा ५ दि. २५.०६.२०२४.

४. संचालक, लेखा व कोषागारे, म.रा. मुंबई यांचे पत्र क्र. संलेवको-२०२५ / निवृत्तीवेतन (संगणकीकरण) / ८१ दि. २७.०३.२०२५.

प्रस्तावना:

(अ) महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील अधिकारी व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेखे प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २ कार्यालय, मुंबई व नागपूर येथे ठेवण्यात येतात. तसेच भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दरमहा भविष्य निर्वाह निधीची त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम लघुसंदेशाद्वारे त्यांच्या मोबाईल फोनवर कळविण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील अधिकारी व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या लेख्यांचे वार्षिक विवरणपत्र प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २ कार्यालय, मुंबई व नागपूर यांचेकडून मुद्रित करून अधिकारी व कर्मचारी यांना पुरविण्याची पध्दत उक्त ‘वाचा’ येथील अनुक्रमांक १ येथे नमूद शासन निर्णयान्वये सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून बंद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सद्यास्थितीत उपरोक्त ‘वाचा’ येथील अनुक्रमांक २ येथे नमूद शासन निर्णयान्वये सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासूनच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वार्षिक विवरणपत्र

संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या सेवार्थ प्रणाली मधील लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(आ) सद्यस्थितीत सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा मृत्यु पावणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील रकमेचे अंतिम प्रदान करण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुख नियमोचित प्रस्ताव पारंपरिक पद्धतीने भौतिक स्वरूपात संबंधित प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) कार्यालयास मंजुरीस्तव सादर करतात. सदर प्रस्तावाची यथोचित तपासणी करून, संबंधित महालेखापाल कार्यालय भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान आदेश प्राधिकारपत्र तयार करून, त्याच्या मुद्रित स्वरूपातील प्रती संबंधित अधिकारी / कर्मचारी, संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, किंवा संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी, यांना टपालाव्दारे / हस्तबटवड्याने पाठवितात.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

(इ) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान आदेशाची / प्राधिकारपत्राची (GPF Final Payment Authority ची) वैधता सहा महिन्यांची असते. राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्याबाबतीत काही प्रकरणी आहरण व संवितरण अधिकारी भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाची देयके वेळेत अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उप कोषागार कार्यालय येथे सादर करीत नाहीत. सहा महिन्यांच्या विहित मुदतीत भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाचे देयक कोषागार कार्यालयास सादर न केल्यास, अशी भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान प्राधिकारपत्रे अविधिग्राह्य (Invalidate) ठरतात. त्यामुळे अशी अविधिग्राह्य प्राधिकारपत्रे पुनर्विधीग्राहय (Revalidate) करण्याकरीता प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) कार्यालयास परत पाठविण्यात येतात, भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान प्राधिकारपत्रे पुनर्विधीग्राहय करण्याच्या प्रक्रियेकरीता बराच कालावधी विनाकारण खर्ची पडतो. तसेच, त्यामुळे निवृत्तीवेतनधारकास भविष्य निर्वाह निधीची अंतिम रक्कम प्रदान होणेस अवाजवी विलंब होतो. त्याचप्रमाणे प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) कार्यालयाकडील कामाचा ताण अनावश्यकरित्या वाढतो. तसेच विलंबाने झालेल्या प्रदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून तक्रारी केल्या जाण्याचे प्रसंग उद्भवतात.

(ई) शासकीय कामकाजामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून कामकाजात सुलभता, सुसूत्रता निर्माण करणे, सेवा जलदगतीने उपलब्ध करुन देऊन कार्यक्षमता वाढविणे अभिप्रेत आहे. त्यास अनुसरून, प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१ व २ कार्यालय, मुंबई व नागपूर यांचे सहमतीने व सहकार्याने भविष्य निर्वाह निधी विषयक सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक / डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने

कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस होता. भविष्य निर्वाह निधी खात्यातील रकमेचे अंतिम प्रदानाचे प्राधिकारपत्र (GPF Final Payment Authority) निर्गमित करणे व सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचाऱ्यांस किंवा मृत अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करणे ही संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी व निवृत्तीवेतनधारकांना अनुज्ञेय असलेले भविष्य निर्वाह निधी अंतिम रकमेचे प्रदान वेळेत व्हावे, यासाठी भविष्य निर्वाह निधी खात्यातील रकमेचे अंतिम प्रदानाचे प्राधिकारपत्र संगणकीकृत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून उक्त ‘वाचा’ येथील अनुक्रमांक ३ येथे नमूद शासन पत्रान्वये जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे आणि जिल्हा कोषागार कार्यालय, नागपूर, येथे e-GPF कार्यप्रणाली प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दि.०१ ऑगस्ट, २०२४ पासून e-GPF कार्यप्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून, ती यशस्वीरित्या सुरु आहे.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

(उ) प्रस्तावित e-GPF कार्यप्रणालीमुळे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी अर्ज सादर करणे, त्यांचे प्राधिकारपत्र निर्गमित होऊन आहरण व संवितरण अधिकारी तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय येथे ते टपालाद्वारे प्राप्त होणे, त्याबाबतचे देयक तयार केले जाऊन पारीत होऊन निवृत्तीवेतनधारकाच्या खात्यामध्ये अंतिम रक्कम जमा होणे या प्रक्रियेमधील कालापव्यय टळेल. तसेच सदर प्रक्रियेमध्ये अचूकता, पारदर्शकता, गतिमानता येईल. अर्ज, प्रस्ताव, प्राधिकारपत्र, इत्यादी चुकीच्या पत्यावर पोहोचणे, गहाळ होणे, इत्यादी संभाव्य शक्यता देखील टळतील. यामुळे निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या संख्येमध्ये घट होईल. कागद, मुद्रण, टपाल, वीज, इत्यादींवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन, हाताळणीसाठी लागणारे मानवी श्रम व वेळ यामध्ये देखील बचत होईल. तसेच शासनाच्या कागदविरहीत (Paperless) कामकाजाच्या धोरणाची अंमलबजावणी होईल.

(ऊ) या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना अंतिम भविष्य निर्वाह निधीचा लाभ विनाविलंब प्रदान होण्याच्या अनुषंगाने प्रधान महालेखापाल (ले. व अ.) महाराष्ट्र १ व २ कार्यालय, मुंबई व नागपूर आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये, उप कोषागार कार्यालये येथे e-GPF कार्यप्रणाली सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

१. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २ कार्यालय, मुंबई व नागपूर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील सेवानिवृत्त

होणाऱ्या किंवा सेवांतर्गत मृत्यु पावणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालय, मुंबई व नागपूर यांचेकडून सद्यस्थितीत प्राप्त होत असलेली भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान प्राधिकारपत्राची मुद्रीत प्रत (Physical Copy of Final Order / Authority of GPF) दि.१५ जुलै, २०२५ पासून निर्गमित करणे बंद करून, त्याऐवजी ती इलेक्ट्रॉनिक पध्दतीने PDF Copy स्वरूपात निर्गमित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

२. महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील सेवानिवृत्त होणाऱ्या / सेवांतर्गत मृत्यु पावणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात भविष्य निर्वाह निधी खात्यातील रकमेचे अंतिम प्रदान दि.१५ जुलै, २०२५ पासून पुढे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त ‘भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई-प्राधिकारपत्राच्या PDF Copy च्या आधारे करण्यास मान्यता देण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई-प्राधिकारपत्राच्या PDF Copy चे जतन, हस्तांतरण इत्यादीसाठीच्या सुधारित कार्यपध्दतीला मान्यता देण्यात येत असून, यापुढे या कार्यपध्दतीचा अवलंब करणे सर्व संबंधितांसाठी अनिवार्य राहील.

३. e-GPF कार्यप्रणालीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही :-

३.१) महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या सेवानिवृत्त होणाऱ्या / सेवांतर्गत मृत्यु पावणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करून, ऑनलाईन पध्दतीने संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास सादर करण्यात यावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे जोडून प्रचलित हस्तलिखित पध्दतीने देखील असे प्रस्ताव संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास पाठविण्यात यावेत.

३.२) अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रकरणातील शिल्लक रक्कम, थकबाकी, व्याज, अन्य कोणत्याही प्रकारची देय रक्कम रोखून ठेवली असल्यास आणि ती यथावकाश प्रदान करावयाची झाल्यास अथवा काही फरक अनुज्ञेय ठरल्यास वरील पध्दतीनुसारच संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास सुधारित प्रस्ताव पाठविण्यात यावा.

३.३) महाराष्ट्र शासनाच्या ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ गटातील सेवानिवृत्त होणारे अधिकारी / कर्मचारी किंवा मृत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नामनिर्देशित व्यक्ती प्रदान स्वीकारण्याकरीता त्यांच्या सोयीप्रमाणे राज्यातील कोणत्याही बँक आणि शाखेची निवड करु शकतील. त्याकरीता संबंधितांनी बँक खात्याचा संपूर्ण तपशील (खाते क्रमांक, IFS Code व रद्द धनादेश अथवा बँक

पासबुकचे प्रथम पृष्ठ), प्रस्ताव महालेखापाल कार्यालयास पाठविण्यापूर्वीच आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.

संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान प्रस्ताव प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा मोबाईल फोन क्रमांक व ई-मेल आयडी प्रस्तावामध्ये अचूकपणे नोंदवावा. जेणेकरून प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव अंतिमरित्या मंजूर झाल्याबाबत निवृत्तीवेतनधारकाला सूचना / संदेश पाठविणे शक्य होईल.

३.४) प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव अंतिमरित्या मंजूर झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाचे ई-प्राधिकारपत्र (GPF Final Withdrawal e-Authority) व प्राधिकृत ऑनलाईन विदा (Data) संबंधित कार्यालयाच्या बील पोर्टल प्रणालीच्या Assistant Login मध्ये ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होईल.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

३.५) अंतिम प्रदानानंतर भविष्य निर्वाह निधीमध्ये शिल्लक रक्कम आढळल्यास, थकबाकी, व्याज किंवा अन्य कोणत्याही प्रकारची देय रक्कम रोखून ठेवली असल्यास आणि ती यथावकाश प्रदान करावयाची झाल्यास अथवा काही फरक अनुज्ञेय ठरल्यास, वरील पध्दतीनुसारच सुधारित भविष्य निर्वाह निधी प्रदान ई-प्राधिकारपत्र (GPF revised e-Authority PDF Copy) संबंधित कार्यालयाच्या बील पोर्टल प्रणालीच्या Assistant Login मध्ये ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होईल.

३.६) सेवानिवृत्त होणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रदान ई-प्राधिकारपत्र (GPF Final Withdrawal e-Authority) सेवार्थ प्रणालीमध्ये त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये PDF Copy स्वरुपात उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेले संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना अंतिम भविष्य निर्वाह निधी ई-प्राधिकारपत्र (GPF Final Withdrawal e-Authority) निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये PDF Copy स्वरुपात उपलब्ध होईल.

३.७) प्रधान महालेखापाल (ले. व अ.) महाराष्ट्र-१/२ कार्यालय, मुंबई / नागपूर यांचे कार्यालयाकडून प्रस्ताव मंजूर झाल्याबाबत निर्गमित होणारे सूचनापत्र (Intimation Letter) किंवा यथास्थितीत गहाळ अंशदानाबाबत सूचना (Notice of Missing Credit) सेवार्थ प्रणालीमध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांच्या Login मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर झाल्याबाबतचे सूचनापत्र (Intimation Letter) किंवा यथास्थितीत गहाळ अंशदानाबाबत सूचना (Notice of Missing Credit) संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देखील यथास्थिती सेवार्थ प्रणालीमध्ये किंवा निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्यांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये PDF Copy स्वरुपात उपलब्ध होईल.

३.८) सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्र (GPF Final Withdrawal e-Authority) व प्राधिकृत ऑनलाईन विदा (Data) अचूक असल्यास, संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांद्वारे बील पोर्टल प्रणालीमध्ये देयक तयार करून, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय / उप कोषागार कार्यालय येथे सादर करण्यात यावे.

३.९) सेवार्थ प्रणालीमध्ये प्रस्ताव तयार करून प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास ऑनलाईन पध्दतीने पाठविल्यानंतर प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी काही बदल / दुरुस्ती करावयाची झाल्यास याबाबत पूर्वी पाठविलेला प्रस्ताव प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून प्रथम रद्द करून घेण्यात यावा. तद्नंतर आवश्यक ते बदल / दुरूस्ती अंतर्भूत करून प्रस्ताव प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास पुनःश्च सादर करण्यात यावा.

३.१०) प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून मंजूर व अपलोड करण्यात आलेल्या अंतिम भविष्य निर्वाह निधी ई-प्राधिकारपत्रामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास, अशी प्रकरणे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी बील पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने समुचित अभिप्राय नमूद करुन संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने पुन्हा सादर करणे आवश्यक राहील.

३.११) अंतिम भविष्य निर्वाह निधी रकमेच्या ई-प्राधिकारपत्राची वैधता निर्गमन दिनांकापासून सहा महिने असल्यामुळे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी विहित कालावधीत देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय / संबंधित उप कोषागार कार्यालय येथे सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

३.१२) सहा महिन्याच्या विहित मुदतीत देयक अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालय / उप कोषागार कार्यालय येथे सादर न केल्यास अशा प्रकरणी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी बील पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने समुचित अभिप्राय नमूद करुन भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्र संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास परत पाठवावे. आणि प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून भविष्य निर्वाह

निधी अंतिम प्रदान ई- प्राधिकारपत्र पुनर्विधीग्राहय करून पुनःश्च ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करून

घ्यावे.

४. e-GPF कार्यप्रणालीबाबत प्रधान महालेखापाल (ले. व अ.)-१ महाराष्ट्र, मुंबई आणि प्रधान महालेखापाल (ले. व अ.)-२ महाराष्ट्र, नागपूर यांनी करावयाची कार्यवाही :-

४.१) सेवार्थ प्रणालीमार्फत व प्रचलित पध्दतीने अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर याबाबत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना लघुसंदेश (SMS) द्वारे संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून कळविण्यात यावे.

४.२) सेवार्थ प्रणालीमार्फत व प्रचलित पध्दतीने प्राप्त झालेल्या अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्तावांची तपासणी करून भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्र व प्राधिकृत ऑनलाईन विदा (Data), प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयातील IM Server वर उपलब्ध करून देण्यात यावा.

४.३) अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी काही बदल / दुरूस्ती करण्याबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याने विनंती केल्यास, सदर प्रस्ताव सेवार्थ प्रणालीमध्ये रद्द करून देण्यात यावा.

४.४) अंतिम भविष्य निर्वाह निधी ई-प्राधिकारपत्रामध्ये दुरुस्ती असल्यास, अशा प्रस्तावांमध्ये संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याने ऑनलाईन अभिप्राय नमूद करुन दुरूस्तीबाबत विनंती केल्यास, अशा प्रकरणी आवश्यक दुरूस्ती करून सुधारित भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई- प्राधिकारपत्र व प्राधिकृत ऑनलाईन विदा (Data), प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयातील IM Server वर पुनःश्च उपलब्ध करून देण्यात यावा.

४.५) प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालय मुंबई व नागपूर यांच्याकडून अंतिम भविष्य निर्वाह निधीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना लघुसंदेश (SMS) द्वारे संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून कळविण्यात यावे.

४.६) भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई-प्राधिकारपत्र पुनर्विधीग्राहयतेसाठी प्राप्त झाल्यानंतर पुनर्वैधता करून भविष्य निर्वाह निधी सुधारित अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्र व प्राधिकृत ऑनलाईन विदा (Data), प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयातील IM Server वर उपलब्ध करून देण्यात यावा.

५. e-GPF कार्यप्रणालीबाबत अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई; जिल्हा कोषागार कार्यालय; उप कोषागार कार्यालय यांनी करावयाची कार्यवाही -:

५.१) अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर प्रचलित पध्दतीने प्राधिकारपत्र अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, जिल्हा कोषागार कार्यालय, उप कोषागार कार्यालय यांना आतापर्यंत मुद्रीत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत होते. तथापि, दि.१५ जुलै, २०२५ पासून पुढे e-GPF कार्यप्रणाली अंतर्गत अंतिम भविष्य निर्वाह निधी प्राधिकारपत्र ट्रेझरीनेट प्रणालीमध्ये e-GPF PDF Copy स्वरुपात उपलब्ध होईल.

५.२) आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडून बील पोर्टल प्रणालीमध्ये तयार केलेले देयक अधिदान लेखा कोषागार कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय उप कोषागार कार्यालय येथे सादर झाल्यानंतर ट्रेझरीनेट प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई- प्राधिकारपत्र आणि देयकासोबत जोडण्यात आलेली e-GPF Authority च्या PDF Copy ची पडताळणी करून, देयक पारीत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

५.३) अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालय / उप कोषागार कार्यालयामार्फत अंतिम भविष्य निर्वाह निधी ई प्राधिकारपत्राच्या आधारे रक्कम प्रदान करण्यात आल्यानंतर, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

५.४) आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडून विहित कालावधीत देयक अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालय / उप कोषागार कार्यालयास सादर न झाल्यास, अशी भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्रे ट्रेझरीनेट प्रणालीमध्ये ऑनलाईन अभिप्प्राय नमूद करुन संबंधित प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास परत पाठविण्यात यावीत. भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान ई प्राधिकारपत्र वैध असल्याबाबत प्रभारी सहायक अधिदान व लेखा अधिकारी किंवा जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडून दरमहा आढावा घेण्यात यावा.

६. e-GPF कार्यप्रणालीबाबत संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी करावयाची कार्यवाही -:

६.१) e-GPF कार्यप्रणालीच्या अनुषंगाने सेवार्थ, ट्रेझरीनेट, बील पोर्टल या प्रणालींमध्ये आवश्यक ते विकसन करण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

६.२) सेवार्थ प्रणालीमध्ये अंतिम भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव तयार करताना व बील पोर्टल प्रणालीमध्ये देयक तयार करताना आहरण व संवितरण अधिकारी यांना तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई येथे संपर्क साधावा

७. उक्त कार्यप्रणालीस अनुसरून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (Shalarth), आदिवासी विकास विभाग (Ashramshalarth), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (Ayurvedarth), सामाजिक न्याय विभाग (Samaj Sevaarth), इतर मागास बहुजन कल्याण विभाग (VJNT Sevaarth), पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (Mafsuarth), कृषी विभाग (Sausevaarth), उच्च व तंत्र शिक्षण विभाग (HTESevaarth) कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (HTESevaarth) या विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास पाठविणे शक्य व्हावे, यासाठी संबंधित प्रणालीमध्ये समुचित विकसनाबाबत आवश्यकता असल्यास, संबंधित विभागांनी संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सहकार्य घ्यावे.

८. पुढील आदेश होईपर्यंत वैध प्रशासकीय स्वरुपाच्या अडचणींमुळे ज्या प्रकरणांमध्ये सेवार्थ प्रणाली वापरण्यात येत नाही, तसेच बील पोर्टल प्रणालीमध्ये देयके तयार करण्यात येत नाहीत, (उदाहरणार्थ मा. उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, इत्यादी) अशा प्रकरणी संबंधित कार्यालयांमार्फत पाठविण्यात आलेली अंतिम भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयाकडून मंजूर करण्यात आल्यानंतर, अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रदान प्राधिकारपत्र प्रचलित पध्दतीने मुद्रीत स्वरुपात संबंधित आहरण व संवितरण अधिकारी, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांना उपलब्ध करून दिली जातील.

९. प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालयास अंतिम भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव सादर करताना कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक (DDO Code) अचूकपणे नमूद करण्याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावयाची आहे.

१०. प्रस्तुत शासन निर्णय, प्रधान महालेखापाल (ले. व अ.) कार्यालय, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भक्र. PF(Misc) /UOR/e-GPF/2025/22 दिनांक १७ एप्रिल, २०२५ व सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा ४ कार्यासन यांनी अनौपचारीक संदर्भ क्र. ३०/सेवा ४, दिनांक ९ मे, २०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०६१८११०७२३४२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

Related posts:

Leave a Comment