प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “डॉ.सी.आर.राव” bhartiy ganittadnya Calyampudi Radhakrishna Rao
डॉ.सी.आर.राव Calyampudi Radhakrishna Rao (1920-2023) जीवन : १० सप्टेंबर, १९२० ला कर्नाटकातील ‘हडगळी’ येथे डॉ. सी. आर. राव यांचा जन्म झाला. त्यांना गणित विषयाची विशेष आवड होती. ही बाब लक्षात घेऊन त्यांचे वडिलांनी त्यांना गणितातील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी गणितात दोन पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. पहिली एम.ए. पदवी आंध्र विद्यापीठातून त्यांनी प्राप्त केली. दुसरी एम.ए. पदवी त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेत नोकरी करत असताना कोलकाता विदयापीठातून प्राप्त केली. केंब्रिज येथे पुरातत्त्वशास्त्र व मानववंशशास्त्र संग्रहालयाने राव यांना संशोधनासाठी निमंत्रित केले. तेथे त्यांनी संशोधन करून केंब्रिज विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळवली. त्यांना प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ आर. ए. फिशर यांनी मार्गदर्शन केले. संख्याशास्त्र विषयात बहुचल प्रचरण विश्लेषण व इतर बहुचल कसोट्यांचा शोध त्यांनी लावला. या कामासाठी केंब्रिज विद्यापीठांनी त्यांना डी. एस्सी. पदवी दिली. ‘ऑनररी लाइफ फेलो ऑफ किंग्स कॉलेज, केंब्रिज’ हा दुर्मीळ सन्मान त्यांना दिला. १९४८ ला ते भारतात आले व ‘आयएसआय’ या कोलकाता येथील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी ५० विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी मार्गदर्शन केले. कार्य : * सी. आर. राव हे भारतीय-अमेरिकन सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर एमेरिटस होते. * ते बहुविविध विश्लेषण, सांख्यिकीय आनुवंशिकता आणि डीएनए अनुक्रमणातील अग्रगण्य कार्यासाठी ओळखले जातात. * त्यांच्या ‘थिररी ऑफ एस्टिमेशन’ साठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी राव-ब्लॅकवेल प्रमेय आणि क्रेमर राव बाउंड विकसित केले. ऑर्थोगोनल स्कोअर चाचणीसाठी ते ओळखले जातात. * २०१० मध्ये त्यांना ‘राष्ट्रीय विज्ञान पदक’ प्रदान करण्यात आले. ते १९८५ ते १९८७ या काळात ‘आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष होते. विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना २०१३ मध्ये ‘पद्मविभूषण पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध
| अणु.क्र | गणिततज्ञ | परिचय/माहिती |
| १ | आर्यभट्ट | क्लिक करा |
| २ | वराहमिहिर | क्लिक करा |
| ३ | भास्कर (पहिले) | क्लिक करा |
| ४ | ब्रह्मगुप्त | क्लिक करा |
| ५ | महावीर | क्लिक करा |
| ६ | भास्कराचार्य (द्वितीय) | क्लिक करा |
| ७ | श्रीनिवास रामानुजन | क्लिक करा |
| ८ | पी.सी.महालनोबिस | क्लिक करा |
| ९ | सत्येंद्रनाथ बोस | क्लिक करा |
| १० | डॉ.सी.आर.राव | क्लिक करा |
| ११ | शकुंतला देवी | क्लिक करा |
| १२ | डी.आर.कापरेकर | क्लिक करा |
| १३ | नरेंद्र करमरकर | क्लिक करा |
| १४ | क्लिक करा | |









