माहे मार्च २०२६ चे वेतन महागाई भत्ता फरकासह अदा करणे बाबत dearness allowance
संदर्भ-
१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. मभवा-१३२५/प्र.क्र/१९/सेवा-०९/दि.२५/०२/२०२६
२. शासन पत्र संकिर्ण२४१९//प्र.क्र४२/अर्थसंकल्प/दि.२५/०२/२०२६
३. मा आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र अंदाज २०१ महागाई भत्ता/आय/१७४५८५४/२६ दि.२६/०२/२०२६
महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर विषयांकित प्रकरणी शासन निर्णय उपलब्ध आहे. दि.०१/०७/२०२५ पासून महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून माहे जूलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ या महिण्यात रोखीने अदा करणे बाबत निर्देश आहेत तदनुसार कार्यवाही करण्यात यावी.
संदर्भ शासन निर्णय निर्गमित होणे पूर्वी ज्या जिल्हयांचे माहे फेबुवारी २०२६ चे वेतन कोषागारात पारित झाले होते अशा जिल्हयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे माहे फेबुवारी २०२६ या एक महिण्याचा देय महागाई भत्ता फरक मार्च २०२६ या महिण्यात रोखीने अदा करण्यात यावा.








