निवडणुकीच्या कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत nivdnuk pratiniyukti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवडणुकीच्या कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत nivdnuk pratiniyukti 

संदर्भ : अवरसचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२६/प्र.क्र.१७६/टीएनटी-१, दि.३० मार्च, २०२६

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय पत्रानुसार शासनाने, निवडणुकीच्या कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबतचे निर्देश दिले आहेत.

संदर्भिय पत्रानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूकीच्या वा अन्य कामकाजाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने सोबतच्या २ तक्त्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक विभागामधील –

१. प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांमधुन प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षक कर्मचा-यांची माहिती,

२. खाजगी शिक्षण संस्था प्राथमिक विभागामधील प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांमधुन प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षक कर्मचा-यांची माहिती.

याप्रमाणे वरील दोन तक्त्यांतील माहिती तात्काळ आपले स्वाक्षरीनिशी एकस्तर पध्दतीने आपले वरीष्ठ कार्यालयास सादर करावी. अशाप्रकारे प्राप्त झालेली माहिती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संचालनालयास सादर करण्यात यावी.

Leave a Comment