जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना census paripatrak
संदर्भः – गृह सचिव, भारत सरकार यांचे अर्धशासकीय पत्र क्र. D.O.N०.९/१२/२०२६-CD (Cen), दि.११ मार्च, २०२६.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव, भारत सरकार यांनी संदर्भाधिन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम, १९४८ आणि जनगणना नियम, १९९० अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट-ड संवर्गातील (जिल्हा परिषदांमधील सर्व शिक्षकांसह) कर्मचाऱ्यांची सन २०२६ ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
२. सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.










