पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत pavitra portal shikshak bharti paripatrak
संदर्भ
:- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. प्रशा २०२३/प्र.क्र.०३/का.२ (२) /७८९९, दि.०९.०९.२०२६
महोदय/महोदया,
उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्रान्वये पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
२. याअनुषंगाने कळविण्यात येते की, एकूण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रत्येक शाळेत कोणत्या विषयाची किती पदे भरली जातील याबाबत प्रथमतः निश्चिती करावी. आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहे ही बाब लक्षात घेता, पवित्र पोर्टलअंतर्गत शिफारसप्राप्त पात्र नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना न देता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या विचारात घेऊन, रिक्त पदे समप्रमाणात भरली जातील याप्रमाणे नियोजन करून पदस्थापना द्यावी. आश्रमशाळेत सर्व विषयांसाठी शिक्षक उपलब्ध होतील याप्रमाणे नियोजन करण्यात यावे, ही विनंती.











