संचमान्यता शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी महत्त्वाच्या सूचना लिंक उपलब्ध sanchmanyata important instructions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी महत्त्वाच्या सूचना लिंक उपलब्ध sanchmanyata important instructions 

Link https://student.maharashtra.gov.in/studentportal/users/login

शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी महत्त्वाच्या सूचना

1. Student Forward for Sanch Manyata : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा डेटा फॉरवर्ड करण्याची सुविधा दिनांक १०/१०/२०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. सन 2026-27 च्या संच मान्यता

कामकाजाच्या अनुषंगाने दि.

30/09/2026 रोजी यु-डायस प्लस व सरल पोर्टलवर नोंद असलेल्या आधार व्हॅलीड विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. दि. 30 सप्टेंबर 2026 पूर्वी सरल व यु-डायस प्लस पोर्टलवरील संच

मान्यतेकरिता सर्व माहिती अंतिम करणे

अनिवार्य आहे. मुदतवाढ मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच, UDISE Plus पोर्टलवर शाळेने शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे; उदा. शाळेचे माध्यम, तुकडी (division), विद्यार्थ्यांची आधार पडताळणी, विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी इत्यादी.

सरल पोर्टलवरील भूमिकाः

* शाळा पोर्टल (School portal):

शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या तुकडीची (division) माहिती भरुन अंतिम करणे आणि शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

टीप:- जोपर्यंत प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या तुकडीची माहिती अंतिम करून

शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता घेत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांची ‘संच मान्यता’ माहिती मंजुरीसाठी केंद्र प्रमुख/गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवता येणार नाही.

* विद्यार्थी पोर्टल (Student portal):

शाळेच्या मुख्याध्यापकांनी ‘संच मान्यता’साठी विद्यार्थ्यांची माहिती पुढे पाठवणे आणि केंद्रप्रमुख /गट

शिक्षणाधिकारी यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

* संच मान्यता पोर्टल (Sanch Manyata portal): शाळेच्या मुख्याध्यापकांनी मान्यताप्राप्त विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची माहिती भरणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आणि अंशतः अनुदानित (20,

40.60.80 टक्के) शाळांसाठी ‘शालार्थ’ (Shalarth) पोर्टलवरून कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती घेणे, ती अंतिम करणे आणि शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी ‘बेस पोस्ट्स’ (कमाल वर्षाची पदे) यांची पडताळणी करून त्यांना मान्यता देणे आवश्यक आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची ‘संच मान्यता’ प्रक्रिया, प्रत्येक शाळेने वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक मान्यता प्राप्त केल्यानंतरच सुरू/पूर्ण केली जाऊ शकेल.

2. Student Data Correction: Sanch Manyata मधील विद्यार्थी माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी

Student Data Correction सुविधा Academic Year 2025-26 आणि 2026-27 या दोन्ही शैक्षणिक वर्षांसाठी उपलब्ध आहे. Division, Medium, Stream आणि PEN संबंधित आवश्यक

दुरुस्त्या दिनांक 30/09/2026 पूर्वी

अनिवार्यपणे पूर्ण कराव्यात, जेणेकरून

Sanch Manyata साठी Student

Count Forward प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल.

3. Academic Year:

लॉगिन केल्यानंतर स्क्रीनच्या उजव्या वरच्या बाजूला Academic Year निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार Academic Year बदलून संबंधित शैक्षणिक वर्षातील माहिती पाहता येईल.

4. Student Tracking Survey System:

सर्व शाळांसाठी Student Tracking Survey System ची सुविधा Student Portal वरील सर्व संबंधित लॉगिनमध्ये (Head Master, Cluster, BEO) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्वेक्षणातील कुटुंब प्रमुख (Family Head), कुटुंब सदस्य (Family Members), शाळाबाह्य मुले (Out of School Children), स्थलांतरित मुले (Migrated In/Out Children) यांची माहिती स्तरनिहाय (Head Master, Cluster, BEO, Director) पडताळणी व मंजुरीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment