“आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज” मराठी निबंध apatti vyavasthapan nibandh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज” मराठी निबंध apatti vyavasthapan nibandh 

भरभरून दान देणारा निसर्ग आला नटून, बहरून साधण्यास सजीवांशी संपर्क पण अतिरेक नको रे मानवा, हा नाश थांबव, भूमातेचे तन मन जळते आहे पूर्वीच्या काळातील अश्मयुगीन मानव ते आजचा मानव हा ऐतिहासिक प्रवास आपण अनुभवलेला आहे व अश्मयुगापासून सुरू झालेल्या मानवाचा प्रवास आजतागायत चालू आहे; पण या प्रवासात त्याने त्यांच्या क्षमतेनुसार निसर्गाचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने व सोयीने संकल्पना बनवण्यास सुरुवात केली. पृथ्वीवर नवीन नवीन संकल्पना जन्माला घालून निसर्गातील कित्येक गोष्टींना आव्हान देऊन त्या साध्य केल्या आहेत. उदा. जसे की, पाण्याचे स्रोत शोधण्याकरिता कूपनलिका घेणे, परिणामी निसर्ग नियम मोडला की त्याचे दुष्परिणाम आपल्यासमोर येतातच. मानवाने आपली प्रगती साधताना निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करायला सुरुवात केली, त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यामधली गुंतागुंत अधिकच वाढत गेली. आपत्तीचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. ते म्हणजेच ‘नैसर्गिक आपत्ती’ व ‘मानवनिर्मित आपत्ती,’ नैसर्गिक घडामोडींतून घडणाऱ्या आपत्तींना ‘नैसर्गिक आपत्ती’ असे म्हणतात. त्यामध्ये भूकंप, चक्रीवादळ, महापूर, भूस्खलन, त्सुनामी, वीज कोसळणे, दुष्काळ, उल्कापात, संसर्गजन्य रोग (जसे की कोरोना) या सर्व आपत्तींचा समावेश होतो, तर आग, अपघात, तेलगळती, वायुगळती, खाणीमध्ये अडकणे, विस्फोट, युद्ध, चेंगराचेंगरी, बॉम्बस्फोट, अणुभट्टीतील किरणोत्सर्ग या सर्व आपत्तींचा समावेश ‘मानवनिर्मित आपत्ती’ मध्ये होतो. आपत्तींचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतात. आपत्तींमुळे जीवित व वित्तीय हानी होते, पर्यावरण संतुलन बिघडते. त्यामुळे मानवी जीवनात अडथळे निर्माण होतात. नैसर्गिक व मानवी आपत्तींवर मात करायची असेल, तर मानवाला त्या संकटांशी सामना करण्याचे म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपत्ती जर ओढावली तर तिचा प्रतिकार करणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपत्तीची तीव्रता कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते, तर यात सरकार शासन यंत्रणेतील सर्व घटक, उ‌द्योगपती, व्यावसायिक, विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे. आपत्तीचे व्यवस्थापन करताना आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन हे ‘आपत्ती व्यवस्थापना’चे महत्त्वाचे तीन टप्पे आहेत. आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे संभाव्य आपत्तींच्या भागांमध्ये धोक्याची पूर्वसूचना देण्यात येते. त्यामुळे आपत्ती कोसळल्यावर कमीत कमी नुकसान होते. उदा. चक्रीवादळ येणार असेल, तर हवामानाचा अंदाज घेऊन मासेमारांनी मासेमारी करण्याकरिता समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा देता येतो, तसेच समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटन निर्माण करण्यात येते. ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये ‘बचाव आणि शोधमार्ग’ आहे. यामध्ये आपत्ती पीडितांना त्या आपत्तीमधून सोडवण्यासाठी मदत केली जाते. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काम करण्यात येते. ‘आपत्ती व्यवस्थापन दला’ची केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरील यंत्रणा सुसज्जपणे काम करीत असते. प्रत्येक पातळीवर प्राधिकरणाचे अधिकार कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या असतात. त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यादेखील निश्चित केल्या जातात. अधिकार आणि जबाबदाऱ्यांची काटेकोरपणे विभागणी झालेली असते. निसर्गनिर्मित आपत्ती टाळता येणार नाही, परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे, तिची तीव्रता कमी करणे व त्यापासून होणाऱ्या हानीचे प्रमाण नक्कीच कमी करता येणे शक्य आहे. येणाऱ्या आपत्तीची चाहूल जर आपल्याला आधीच लागली तर त्याबाबत लोकांना वेळीच सावध करणे, होणारी हानी कमी करणे शक्य आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे आणि अवकाशात सोडलेल्या उपग्रहामुळे त्सुनामी वादळे, गारपीट अतिवृष्टीचा अंदाज घेणे शक्य झाले आहे. पूर्व अंदाज घेऊन लोकांना त्याविषयी आधीच कल्पना देऊन सतर्क राहता येते. आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी व पुनर्वसनासाठी करावयाच्या गोष्टी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार असतात. आपत्ती लहान अथवा मोठी असली, तरी तिच्या नियंत्रणासाठी कितीही पूर्वतयारी केली तरीही, ऐनवेळी ती कमीच पडते. अचानक आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी तिथे असलेले नागरिकच शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जातात. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी दाखवलेली एकजूट महत्त्वाची ठरते. आपत्तीबाबत पूर्वतयारी, आपत्तीचा सामना करणे व आपत्तीनंतरचे पुनर्वसन यांबाबत लोकशिक्षण देणे आवश्यक आहे. आपत्तीच्या वेळी गोंधळाची स्थिती जितकी कमी असेल, तितक्या लवकर तिचे व्यवस्थापन करता येते, तसेच आपत्कालीन परिस्थितीही लवकर पूर्ववत होण्यास मदत होते व समाजात ऐक्य टिकून राहते.

मराठी निबंध Marathi Nibandh 

अणु.क्र निबंधाचे नाव pdf download
1 ग्रंथ हेच गुरु क्लिक करा 
2 मोबाईल शाप की वरदान क्लिक करा
3 मराठी असे आमची मायबोली क्लिक करा 
4 अपयशी हीच यशाची पहिली पायरी क्लिक करा 
5 नेमबाज मनू भाकर क्लिक करा 
6 आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज क्लिक करा
7 covid-19 : एक संकट की संधी क्लिक करा 
8 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू क्लिक करा 
9 भारताची अवकाशीय उत्तुंग झेप क्लिक करा 
10 वर्तमान काळातील स्त्री क्लिक करा 
11   क्लिक करा
12   क्लिक करा
     
     
     
     
     
     
     

Leave a Comment