“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh 

“आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पणती, घराघरांतून मिणमिणती.” या कविवर्य वि. म. कुलकर्णी यांच्या काव्यपंक्तीतून विज्ञानाच्या अंधारमय जगातून सुरू झालेला प्रकाशाचा प्रवास आज थेट विजेच्या दिव्याने त्याची जागा घेऊन लख्ख प्रकाश घरभर झगमगू लागला. विज्ञानाची ही किमया आपल्याला घराघरात दिसते. आज प्रत्येक घरात दूरदर्शन संच, शीतकपाट, फॅन अशी वेगवेगळी इलेक्ट्रिक उपकरणे आपल्या कामी आली आहेत. त्यामुळे आपली कामे वेगाने होऊ लागली. याच विज्ञानाच्या ‘जादुई पेटाऱ्या’तून आपल्याला मोबाइल मिळाला आणि सुरू झाली मानवाची खरी प्रगती. ‘धरलं तर चावतय, सोडलं तर पळतंय!’ अशी अवस्था मनुष्याची झाली आहे. 20, 30, 40 आणि आता 5G, अशी एकावर एक गतिमान माध्यमे प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे मनुष्य माणुसकी हरवून बसला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ दृक्श्राव्य संदेशा‌द्वारे वार्तालाप, संदेश अशा मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या मोहजाळातच त्याचा दिवस संपून जातो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा थोर पुरुषांची महती गाणारी आमची युवापिढी भ्रमणध्वनीच्या चक्रव्यूहात अडकली आहे. 20, 3G, 4G च्या जाळ्यांत अडकलेली आमची तरुण पिढी व बालके ‘पब्जी’ सारखे गेम खेळून स्वतःच्याच जीवाशी खेळतात आणि जीव गमावून बसतात. घरातील अगदी अजाण बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण या भ्रमणध्वनीच्या विळख्यात अडकले आहेत. तंत्रज्ञान, संशोधन या नवनवीन प्रयोगांतून शोध लागले; त्या शोधांचे भयानक आणि विदारक वास्तव आपल्या दृष्टिक्षेपास येऊ लागले. पूर्वी संदेशवहनाची साधने तितकी गतिमान नव्हती; परंतु आजकाल भ्रमणध्वनीच्या वापरामुळे सर्वच गोष्टी गतिमान झाल्या आहेत. त्याचबरोबर भ्रमणध्वनीमुळे देश-विदेशांतील व्यक्तींशी आपल्याला संवाद साधता येणे शक्य झाले आहे. भ्रमणध्वनी शिक्षणक्षेत्रातही वरदान ठरला आहे. मनुष्य आज घरबसल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शिकवणी, सभा घेऊ शकत आहे. भ्रमणध्वनीचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच त्याचे तोटेदेखील आहेत. भ्रमणध्वनीचा सर्वांत मोठा तोटा म्हणजे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे अनेक शारीरिक विकार जावणत आहेत. जसे की, डोळ्यांचे, कानांचे आजार, मानसिक आजार इत्यादी लहान मुलांमध्ये मोबाइलचा अतिरेक झाल्याने दृष्टिदोष कमी होण्याचे आजार जाणवत आहेत. तसेच मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने देखील श्रवणदोष जाणवत आहेत. भ्रमणध्वनीचा अतिवापर केल्यामुळे लहान मुलांमध्ये मानसिक त्रासदेखील जाणवत आहेत. जसे की, चिडचिड होणे, एकटे राहणे, कुणाशी जास्त संवाद न साधणे, सतत भ्रमणध्वनीमध्ये व्यस्त राहणे इत्यादी. याशिवाय भ्रमणध्वनीमुळे अपघातांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. भ्रमणध्वनीच्या वापराने मनुष्य मनसोक्त जगणे विसरला आहे. जसे की, श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात विश्वरूप दर्शन दाखविले, तसेच आपल्याला विश्वरूप दर्शन घडविणाऱ्या भ्रमणध्वनी या तंत्रज्ञानाचा आपण सद्स‌द्विवेक बुद्धीने वापर केला तर, भ्रमणध्वनीसारखे दुसरे ज्ञानाचे, माहितीचे आणि संपर्काचे साधनच होऊ शकत नाही. म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, की भ्रमणध्वनीचा अतिरेक टाळा, ज्ञान अवगत करण्यासाठीच भ्रमणध्वनी वापरा. करू थोडे मनोरंजन, करू थोडी करमणूक मनमुराद खेळांचाही आनंद लुटू मैदानावर भर देऊ या मन लावून अभ्यासावर संत, महंतांची थोरवी वाचूया संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, डॉ. एपीजे अब्दुल कलाम होऊया, भारताचे नाव रोशन करूया.

मराठी निबंध Marathi Nibandh 

अणु.क्र निबंधाचे नाव pdf download
1 ग्रंथ हेच गुरु क्लिक करा 
2 मोबाईल शाप की वरदान क्लिक करा
3 मराठी असे आमची मायबोली क्लिक करा 
4 अपयशी हीच यशाची पहिली पायरी क्लिक करा 
5 नेमबाज मनू भाकर क्लिक करा 
6 आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज क्लिक करा
7 covid-19 : एक संकट की संधी क्लिक करा 
8 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू क्लिक करा 
9 भारताची अवकाशीय उत्तुंग झेप क्लिक करा 
10 वर्तमान काळातील स्त्री क्लिक करा 
11   क्लिक करा
12   क्लिक करा
     
     
     
     
     
     
     

9 thoughts on ““मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh ”

Leave a Comment