केंद्र पुरस्कृत “अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे” या योजनेच्या सन २०२६-२७ च्या कृत्ती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत anna suraksha karypranali paripatrak
वाचा:-
१. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.२/औषधे- २, दि.१६.०२.२०२२
२. संचालक, नियामक अनुपालन विभाग, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मंजुरी आदेश क्र. RCD-०४०४०/१२/२०२१-Regulatory-FSSAI-Part (१), दि.११.०५.२०२६
३. उप संचालक, नियामक अनुपालन विभाग, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मंजुरी आदेश क्र.RCD-०४०२१/१२/२०२१-Regulatory-FSSAI, दि.३१.०८.२०२६
४. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. असुमाका/रा.नि./२०२६-२७/१३३५/२०२६, दि.१०.०९.२०२६
प्रस्तावना:-
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वाचा क्र.१, दि.१६.०२.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी त्यांच्या वाचा क्र.२, दि.११.०५.२०२६ रोजीच्या पत्रान्वये सदर सामंजस्य करारास सन २०२६ ते सन २०२९ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार, अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी त्यांच्या वाचा क्र.३, दि.३१.०८.२०२६ रोजीच्या पत्रान्वये सदर सामंजस्य करारांतर्गत सन २०२६-२०२७ या वर्षाच्या कृती आराखड्यास मंजुरी दिलेली आहे. सदर मंजूर कृत्ती आराखड्याची एकूण रक्कम रु.२३८४०.८१ लाख (रु.२३८ कोटी ४० लाख ८१ हजार) इतकी असून, त्यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. सन २०२६-२७ मंजूर कृत्ती आराखड्यास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत विनंती अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी वाचा क्र. ४ येथील पत्रान्वये केली आहे. त्यास अनुसरुन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी क्र.MH/०१/२०२६-२७, दि.३१.०८.२०२६ रोजीच्या आदेशान्वये मंजूर केलेल्या केंद्र पुरस्कृत ‘अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे’ या योजनेचा सन २०२६-२७या वर्षाच्या एकूण रु.२३८४०.८१ लाख (केंद्र हिस्सा-रू.१४३०४.४८ लाख व राज्य हिस्सा- रू.९५३६.३३ लाख) रकमेचा कृती आराखडा राबविण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
1. *अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करणे’ या योजनेच्या सन २०२६-२७ चा कृती आराखडा राबविताना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
Π. सदर कृती आराखड्यात नमुद केलेल्या उपकरणांची खरेदी प्रक्रिया राबविताना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णय क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-३/उद्योग-४, दि.०१.१२.२०१६ च्या खरेदी धोरणातील नमुद खरेदी विषयक प्रक्रियेचे अनुपालन करावे. तसेच, प्रचलित प्रशासकीय तथा वित्तीय नियम तथा विहीत प्रक्रीयेचे अनुपालन करून पुरवठादाराची निवड अंतीम केल्यानंतर L-१ निविदेनुसार येणा-या खर्चास वित्तीय मान्यता घेणे आवश्यक राहील.
Ⅲ. खरेदी करण्यात येणाऱ्या उपकरणांची पुरवठापूर्व/पुरवठानंतर नमुना तपासणी (pre/Post-dispatch random sample inspection) करुन उचित व योग्य विनिर्देश (specification) असलेल्या वस्तुंचीच खरेदी करण्यात येईल, याची खात्री आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी करावी.
IV. खरेदी करण्यात येणाऱ्या उपकरणांचा पुरवठा झाल्यानंतर त्यांची साठवणूक व वितरण (storage & distribution) करणे. तसेच, पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply chain management) आणि वस्तुसूची व्यवस्थापन (Inventory Management) योग्य पध्दतीने करुन सदर बाबी विनावापर पडून राहणार नाहीत व त्यांचा विहीत मुदतीत वापर होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
V. अन्न व औषध प्रशासनाने वाहने भाडेतत्वावर उपलब्ध करून घेताना सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार व प्रचलित वित्तीय नियमानुसार कार्यवाही करावी.
VI. अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण या योजनेच्या सन २०२६-२७ चा कृती आराखड्यात नमुद केलेल्या ज्या-ज्या घटकांसाठी वित्त विभाग, माहिती व जनसंपर्क संचालनालय, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग व इतर संबंधित विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे, अशा घटकांसाठी वित्तीय नियम व
प्रचलित शासन धोरणानुसार विभागामार्फत मान्यता घेण्यात यावी.
VII. सदर खरेदी प्रचलित प्रशासकीय तथा वित्तीय नियमानुसार व आवश्यकतेप्रमाणे आहे हे सुनिश्चित करण्याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांची राहील.
२. प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी दिल्ली व अन्न सुरक्षा आयुक्त यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करार सन २०२६-२७ अंतर्गत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांचेकडून व राज्य शासनाकडून अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचे चालू बँक खाते बँक ऑफ बरोडा, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ या शाखेत खाते क्र.२९०४०१०००१७२६५ IFSC Code BARBOBANEAS (Fifth Character is Zero) यामध्ये जमा करण्यात येणाऱ्या निधीतून भागविण्यात यावा.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०९२११३१८१५६१५५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.









