“नेमबाज मनू भाकर” मराठी निबंध marathi nibandh
“भारत देशाचे नाव अभिमानाने जिने कोरले ऑलिंपिक पदकावर, नेमबाजीत पदक मिळविणारी भारताची कन्या, ती आहे नेमबाजीची राणी-मनू भाकर” भारतातील २२ वर्षीय महिला नेमबाजपटू असलेल्या मनू भाकरचा जन्म हरियाणातील ‘जांजर’ येथे झाला. हरियाणा हे राज्य नेहमीच अनेक खेळांमध्ये अग्रणी असून, या राज्याने भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत. चौदाव्या वर्षी मनू भाकर नेमबाजी या खेळाकडे वळली आणि तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील खेळाडूला पराभूत करून अपेक्षा वाढवल्या. मेक्सिको येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत १० मीटर नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकून तिने ऑलिंपिकला प्रवेश मिळवला होता. संपूर्ण जगात नेमबाजीत यश संपादन केलेल्या मनू भाकरने ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत देदीप्यमान कामगिरी केली आहे. नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून तिने भारताचे नाव ऑलिंपिकमध्ये झळकवले. पॅरिस’ ऑलिंपिकमध्ये १० मीटर नेमबाजीत कांस्यपदक जिंकून भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून देणारी ही भारतीय कन्या मनू भाकर! सर्व भारतवासीयांना तिचा अभिमान आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतास पहिले पदक मिळवून देण्याचा मानही तिला मिळाला आहे. मनू भाकर ही भारतीय महिलांच्या कणखर मानसिकतेचे आणि अत्युच्च ध्येयाचे प्रतीक मानली जाते. पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर नेमबाजी प्रकारात मनूने कांस्य पदक जिंकले असले तरी, तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. आपल्या खेळाविषयी बोलताना मनू भाकर नेहमी सांगते, की सर्वतोपरी आपली क्षमता पणाला लावा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. अंतिम क्षणी नेम धरत असताना तिच्या मनातही तोच विचार होता. तिने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि विजयाला गवसणी घातली. नेमबाजी या खेळात पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला ठरल्याने तिचे हे यश अत्यंत अतुलनीय आहे. तिने आजपर्यंत जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्व करंडक स्पर्धा, आशियाई अजिंक्य स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. यापूर्वी तिला ऑलिंपिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते; पण तिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून आत्मविश्वासाने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे.
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |











1 thought on ““नेमबाज मनू भाकर” मराठी निबंध marathi nibandh ”