प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ्ज “वराहमिहिर” bhartiy ganittadnya varahmihir 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ्ज “वराहमिहिर” bhartiy ganittadnya varahmihir 

जीवन परिचय :- वराहमिहिर ज्यांना ‘वराह’ किंवा ‘मिहिर’ म्हणूनही ओळखले जाते. ते भारतातील तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ज्ञ होते. वराहमिहिर यांचा जन्म उज्जैनमध्ये ‘शिप्रा नदी’ किनारी ‘कायका’ या गावामध्ये एका ज्योतिष परिवारामध्ये इसवी सन ५०५ मध्ये झाला, त्यांचे वडील आदित्यदास हे सूर्यदेवाचे पूजक होते. त्यांनी वराहमिहिर यांना ‘ज्योतिष विद्या’ शिकवली. वराहमिहिरने कुसुमापुराच्या प्रवासादरम्यान प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ज्ञ आर्यभट्ट यांची भेट घेतली. आर्यभट्टांच्या ज्ञानाने आकर्षित होऊन त्यांनी आयुष्यभर खगोलशास्त्र व गणित या विषयांचा अभ्यास करण्याचे ठरवले. गुप्त साम्राज्याच्या काळात, उज्जैन हे कला, विज्ञान आणि संस्कृतीच्या अनेक शाळांसह शिक्षणाचे केंद्र होते. त्यांनी उज्जैनला जाण्याचा निर्णय घेतला, तेथे जगभरातील विद्वान ज्योतिष आणि गणिताचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक जमले होते. कोहली-पाटणा येथे नालंदा विद्यापीठातून त्यांनी गणित विषयाचे शिक्षण घेतले. त्यांचे गुरू आर्यभट्ट होते. त्यांच्या ज्योतिष ज्ञानामुळे ‘मालवा’ राजा यशोधर्मन विक्रमादित्य चंद्रगुप्त (द्वितीय) यांनी त्यांना त्यांच्या दरबारातील नवरत्नांमध्ये सामील करून घेतले. वराहमिहिर हे ग्रीक, इजिप्शियन, रोमन आणि भारतीय खगोलशास्त्राचा संग्रह पंच सिद्धांतिका (पाच ग्रंथ) लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बृहत्संहिता, बृहत जातक, लघु जातक आणि योगयात्रा या ‘वराहमिहिर’ यांच्या इतर चार साहित्यकृती आहेत. ‘वराहमिहिर’ यांच्या गणितीय कार्यामध्ये ‘त्रिकोणमितीय’ सूत्रांचा शोध समाविष्ट होता. त्यांनी आर्यभट्टच्या साइन टेबलची अचूकता सुधारली, त्यांनी शून्याचे बीजगणितीय गुणधर्म, तसेच ऋण संख्यांची व्याख्या केली. शिवाय, ‘पास्कलचा त्रिकोण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवृत्तीचा शोध घेणारे ते पहिले गणिततज्ज्ञ होते. द्विपदी गुणांक काढण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला. ‘पंच सिद्धांतिका’ (पाच तत्त्वे), बृहत्संहिता (मुख्य संग्रह), बृहत जातक (ज्योतिषशास्त्रीय कार्य) या त्यांच्या ग्रंथांनी त्यांना ज्योतिषशास्त्रात, कौटिल्याच्या राजकीय तत्त्वज्ञानात, मनूचे कायद्यात किंवा व्याकरणात पाणिनीइतके उच्च स्थान दिले आहे. वराहमिहिरचे मुख्य कार्य म्हणजे पंच सिद्धांतिका (‘पाच खगोलशास्त्रीय कॅनन्सवरील ग्रंथ, जो आता हरवलेल्या जुन्या भारतीय ग्रंथांची माहिती देतो). ते सूर्य सिद्धांत्तापूर्वीच्या पाच खगोलशास्त्रीय ग्रंथांचा सारांश देते. रोमका सिद्धांत, पौलिसा सिद्धांत, वसिष्ठ सिद्धांत आणि पैतामा सिद्धांत, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात पंच सिद्धांताला एक प्रमुख स्थान आहे. वराहमिहिर हे वेदांमध्ये शिकले होते, पण ते अलौकिक गोष्टींवर आंधळा विश्वास ठेवणारे नव्हते. ते शास्त्रज्ञ होते. आर्यभट्टाप्रमाणेच त्यांनी पृथ्वीचा आकार गोल असल्याचे घोषित केले. विज्ञानाच्या इतिहासात, ते प्रथम असा दावा करतात, की काही ‘बल’ शरीराला गोलाकार पृथ्वीला चिकटून ठेवत असावेत. पृथ्वीच्या वस्तूला आकर्षित करण्याच्या बलाला आता गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. та वराहमिहिर यांनी त्यांच्या निधनानंतरही ज्योतिषावरील अग्रगण्य लेखक म्हणून नाव कमावले, त्यांच्या कृतींनी या क्षेत्रातील जवळपास सर्व पूर्वीच्या भारतीय ग्रंथांना मागे टाकले. त्यानंतरचे अनेक भारतीय ज्योतिषी-खगोलशास्त्रज्ञ त्यांची स्तुती करतात. त्यांची कामे प्राथमिक स्रोत मानतात. अकराव्या शतकातील लेखक अल बिरुनी यांनी वराहमिहिर यांचे वर्णन अपवादात्मक खगोलशास्त्रज्ञ म्हणून केले आहे. सन ५८७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कार्य: पास्कलच्या त्रिकोण आणि द्विपदी गुणांकांची आवृत्ती शोधणारे ते पहिले गणिततज्ज्ञ होते. त्यांनी आर्यभट्टाच्या साइन टेबल्सची अचूकता वाढवली. * त्यांनी ४४ मॅजिक स्क्वेअरचा शोध लावला. ‘पंच सिद्धांतिका’ आणि ‘बृहत्संहिता’ ही त्यांची सर्वांत उल्लेखनीय कामे होती. त्यांनी या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. * त्यानी ‘बृहत्संहिता’ हा विस्तृत ग्रंथदेखील लिहिला, ज्यामध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, ग्रहांच्या हालचाली, ढगांची निर्मिती, ग्रहण, वेळ, पाऊस, ऋतू, शेती आणि इतर अनेक विषयांचा समावेश आहे. त्यांनी ‘बृहत्संहिता’ आणि ‘बृहत जातक’ मध्ये आपले निष्कर्ष काढले, ज्यात भूगोल, नक्षत्र, विज्ञान, वनस्पतिशास्त्र आणि प्राणी विज्ञान समाविष्ट आहे. त्यांनी ग्रीक भाषेचा अभ्यास केला आणि धार्मिकव्यवस्थेच्या दृष्टीने अयोग्य असताना, “विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घेतले.” म्हणून ग्रीक लोकांची (यवनांची) प्रशंसा केली. काही अभ्यासकांचा असा विश्वास आहे, की ते राशिचक्र चिन्हे, ज्योतिषशास्त्रीय गणना आणि शुभविधी, अंदाज समजून घेण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्याचा मजबुतीने वापर होतो. * इब्न बतुता आणि अल बरूनी हे दोन प्रसिद्ध अरब संशोधक, विशेषतः ज्योतिषाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले.

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध

अणु.क्रगणिततज्ञपरिचय/माहिती
आर्यभट्टक्लिक करा 
वराहमिहिरक्लिक करा 
भास्कर (पहिले)क्लिक करा 
ब्रह्मगुप्तक्लिक करा 
महावीरक्लिक करा 
भास्कराचार्य (द्वितीय)क्लिक करा 
श्रीनिवास रामानुजनक्लिक करा 
पी.सी.महालनोबिसक्लिक करा 
सत्येंद्रनाथ बोसक्लिक करा 
१०डॉ.सी.आर.रावक्लिक करा 
११शकुंतला देवीक्लिक करा 
१२डी.आर.कापरेकरक्लिक करा 
१३नरेंद्र करमरकरक्लिक करा 
१४ क्लिक करा 
   

Related posts: