माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखांबाबत ssc online application timetable
संदर्भ – रा.मं/ले. पे०६/परीक्षा शुल्क २०२५-२६/१८६५, दि.०५/०५/२०२६ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे-
सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राम विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्याध्यर्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्याथ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
१. माध्यमिक शाळांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरून भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल.
२. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate). श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
३. कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.
४. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
५. २०२६ च्या आवेदनपत्रातील फोटोमध्ये अनेक त्रुटी होत्या. फेब्रुवारी मार्च २०२६ परीक्षेपासून गुणपत्रक व प्रमाणपत्रावर फोटो छपाई होत असल्यामुळे सोबत जोडलेल्या सूचनाप्रमाणे फोटो upload करणेबाबत सूचना देणे, त्याचप्रमाणे प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर फोटो व विषयामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याबाबत सर्व माध्यमिक शाळांना कळविण्यात यावे फोटोबाबतच्या सविस्तर सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.
६. सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा SBI बँकेच्या Online पेमेंट गेटवेद्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्याच्या application status मध्ये ” Draft” चा “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा “Send to Board” व “Paid” Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
७. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकाच्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्व स्विकारले जाणार नाही. यांची दक्षता घ्यावी
८. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे prelist वर अथवा आवेदनपत्राच्या print out वर विद्यार्थ्यांची / पालकांची स्वाक्षरी घ्यावी.
९. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी माध्यमिक शाळांनी अनेक दुय्यम login, शाळेच्या main login मध्ये तयार करून computer lab मध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून मुख्य login द्वारे त्याची तपासणी करावी.
१०. माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदन पत्राचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
११. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी. उपरोक्त सर्व बाबी विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. (मा. अध्यक्ष यांच्या मान्यतेने)










