5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आदर्श प्रास्ताविक teacher’s day celebration prastavik 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आदर्श प्रास्ताविक teacher’s day celebration prastavik 

सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी सर्व आदरणीय शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो. अतिशय आनंद आणि उत्साहाने भरलेल्या या वातावरणात शिक्षक दिनानिमित्त आयोजित या सुंदर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे.

सामान्यातून असामान्य घडविणारी, ज्ञानाची दालन उघडणारी, अज्ञानाचा अंधार जाळणारी आणि नैतिकतेची मूल्य पाळणारी एक आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक. शिक्षकीपेशा हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे. राष्ट्र निर्मितीचा तो एक ध्यास आहे आणि उदात्त जीवन जगण्यावरील विश्वास आहे असे मला वाटते.

मित्रहो जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळी भांडी घडवितो अगदी तसेच शिक्षक हे मूल्य, संस्कार आणि शिक्षण देऊन अनेक अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनीअर्स घडवितात. जे पुढे जाऊन एक सुदृढ संपन्न राष्ट्र घडवितात . म्हणूनच राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान असामान्य आहे.

आज 5 सप्टेंबरच्या दिवशी अनेक विद्यार्थी शिक्षक बनून अध्यापनाची जबाबदारी पार पाडत असतात. सर्व वर्गासमोर उभे राहून बोलण्याची संधी आणि अनुभव आज बरेच विद्यार्थी घेतात. शिक्षकांचे कार्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीव नक्कीच त्यांना होत असते. याच जाणिवेतून भविष्यातील जबाबदार शिक्षकांचीही पिढी आकार घेत असते.

आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नैतिकता, संस्कार आणि ज्ञानसाधना हे सद्‌गुरु रुजावेत हाच आहे. या उपक्रमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील स्नेहाचे प्रेमाचे नाते अधिकच वृद्धिंगत होईल याचा मला विश्वास वाटतो.

शिक्षकांचे, गुरुचे महत्व व्यक्त करताना संत कबीर म्हणतात

गुरुगोविंद दोउ खडे काकू लागे पाय बलिहारी गुरु आप की, गोविंद दियो बताय

परमेश्वरापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानणारे हे भारतीय संस्कृतीतील संस्कार हीच आजच्या शिक्षक दिनाच्या आयोजनामागील मुख्य प्रेरणा आहे असे मला नमुद करावेसे वाटते.

आयोजन समितीचा सदस्य म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यानी कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारले म्हणून त्यांना धन्यवाद देतो. त्यांचे मोलाचे शब्द ऐकण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोतच. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही असेच मिळत राहील याची आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्याकडून हमी घेतो.

मित्रहो शिक्षक आणि शिक्षक दिनाचे महत्त्व काही शब्दांच्या प्रास्ताविकातून मांडणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून शेवटी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी मला प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार…

Related posts:

Leave a Comment