“अपयश हीच यशाची पहिली पायरी” मराठी निबंध marathi nibandh
“यशाचा डोंगर चढताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.” स्पर्धापरीक्षा, विविध क्रीडा स्पर्धेत हारजीत, यशअपयश येत असते. आयुष्य जगत असताना प्रत्येक वेळेस आपल्या प्रयत्नांना यश येईलच, असे नाही. कोणतीही गोष्ट किंवा ध्येय गाठत असताना त्यामागची मेहनत आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो आणि आपल्याला अपयशाची ठोकर बसते, जय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खेळ, परीक्षा, स्पर्धा यांमध्ये भाग घेताना प्रत्येक खेळाडू आपल्या ताकदीने उतरत असतो. केवळ स्पर्धेच्या नियमाप्रमाणे त्यातून एकजण जिंकतो आणि एक क्रमांकाप्रमाणे मागे राहतो. कुठेतरी क्रम देताना पहिला, दुसरा, तिसरा असा क्रम दिला जातो. अर्थात क्रम मिळालेले कुठे तरी इतरांपेक्षा काकणभर शिल्लक ठरलेले असतात. याचा अर्थ बाकीचे पूर्णपणे बाद किंवा फारच कमी असतात, असा होत नाही. या यशा-अपयशाच्या रस्सीखेच पराजय प्रत्येकाला पचवता आला पाहिजे. आपण वृत्तपत्रांत शेकडो बातम्या वाचतो. परीक्षेत, स्पर्धेत पेपर सोडवता आला नाही म्हणून, कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या अजाण बालकांच्या बातम्या रोजच आपण वाचतो. ध्येय, आशा, प्रेम यांची होतेच का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती. ध्येय, प्रेम, आशा या गोष्टी मृगजळाप्रमाणे असतात. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरतेच आपले ध्येय मर्यादित न ठेवता विस्तृत केले तर, तो नक्कीच चांगला नागरिक बनू शकेल. प्रत्येक जण काही मोठा होऊ शकत नाही. परंतु चांगला आणि उत्तम नागरिक होऊ शकतो. ध्येय पूर्ण करताना ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे तत्त्व सदैव डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. स्त्री-मुक्तीसाठी झटणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, जुन्या रुढींच्या बंधनातून समाजाला मुक्त करू इच्छिणारे गोपाळ गणेश आगरकर यांनी फळाची अपेक्षा न ठेवता कार्य केले आणि म्हणूनच त्याचे परिणाम आपल्याला आज दिसत आहेत. ध्येयप्राप्तीसाठी मनुष्याने अवश्य झपाट्याने आणि ताकदीने प्रयत्न करावेत, पण ते प्राप्त करत असताना मृत्यू/आत्महत्या हा टोकाचा निर्णय न घेता, त्यातून कुठेतरी सुवर्णमध्य शोधून त्याला ‘एक आशेची पहाट’ म्हणून स्वीकारून अपयश पचवावे. आयुष्यात अडथळे तर येणारच, पण त्यांना पार करून जाण्याची जिद्द मनुष्यात पाहिजे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, की उपनिषदात म्हटलेच आहे. ‘उतिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ म्हणजेच, ‘उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्य होईपर्यंत थांबू नका.’
मराठी निबंध Marathi Nibandh
| अणु.क्र | निबंधाचे नाव | pdf download |
| 1 | ग्रंथ हेच गुरु | क्लिक करा |
| 2 | मोबाईल शाप की वरदान | क्लिक करा |
| 3 | मराठी असे आमची मायबोली | क्लिक करा |
| 4 | अपयशी हीच यशाची पहिली पायरी | क्लिक करा |
| 5 | नेमबाज मनू भाकर | क्लिक करा |
| 6 | आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज | क्लिक करा |
| 7 | covid-19 : एक संकट की संधी | क्लिक करा |
| 8 | भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू | क्लिक करा |
| 9 | भारताची अवकाशीय उत्तुंग झेप | क्लिक करा |
| 10 | वर्तमान काळातील स्त्री | क्लिक करा |
| 11 | क्लिक करा | |
| 12 | क्लिक करा | |










2 thoughts on ““अपयश हीच यशाची पहिली पायरी” मराठी निबंध marathi nibandh ”