माझा आवडता सण बैलपोळा my favourite festival bailpola 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझा आवडता सण बैलपोळा my favourite festival bailpola 

बैल पोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये साजरा केला जातो. पोळा सण श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना अंघोळ घालतात, त्यांना सजवतात, त्यांना हार-फुले घालतात आणि अंगावर रंगीत रंग लावतात. त्यांच्या शिंगांना सजावट करून त्यावर सुबक रेषा काढतात. बैलांच्या गळ्यात नवे घुंगरू आणि घंटा बांधली जाते. सायंकाळी गावात बैलांची मिरवणूक काढली जाते. लहान मुले ढोल, ताशा वाजवतात आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण असते. बैल पोळ्याच्या दिवशी शेतीची कामे बंद ठेवली जातात. बैलांना विशेष खाऊ, पुरणपोळी, भाजी-भाकरी इत्यादी दिले जाते. काही ठिकाणी बैलांची स्पर्धाही घेतली जाते. हा सण आपल्याला प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि सेवा यांची शिकवण देतो. बैल हे शेतकऱ्याचे खरे मित्र आणि मदतनीस आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बैलपोळा छोटा निबंध

१. माझा आवडता सण हा बैलपोळा आहे.

२. बैलपोळा हा सण बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.

३. हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्ये-ला साजरा केला जातो.

४. महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

५. या दिवशी शेतातील कामापासुन बैलांना आराम दिला जातो.

६. या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांना झुल, मणी, माळा घालून सुंदर सजवले जाते. शिंगांना रंग लावला जातो.

७. बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणुक काढली जाते

८. बैलांसाठी पुरणपोळीचा खास नैवेदय तयार केला जातो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मराठी निबंध लेखन बैलपोळा

बैलपोळा हा सण बैलांच्या विश्रांतीचा आणि शेतकऱ्याच्या आनंदाचा असतो. ह्या सणामध्ये सर्व शेतकरी उत्साही असतात, शेतकऱ्याची मदत करणाऱ्या बैलाचा हा हक्काचा दिवस असतो आणि प्रत्येक शेतकरी आपला बैल उठून दिसावा, यासाठी या दिवशी आपल्या बैलाची सजावट करीत असतो, शेतकरी बैलांना अंघोळ घालतात, त्यांच्या शिंगाना रंग लावून आणि पाठीवर नक्षीकाम केलेली शाल पांघरतात. त्या दिवशी गावामध्ये सर्व बैलांची मिरवणूक काढली जाते, गावातील सर्व बैलांना, सनई, ढोल, ताशे वाजवून त्यांना एकत्रित आणले जाते, बैल पोळ्याची दिवशी गावामध्ये उत्साही वातावरण असते. घरी बैल नाही असे लोक मातीच्या बैलाची पूजा करतात आणि त्यांना गोड नैवेद्य दाखवतात, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, त्या दिवशी त्यांना संपूर्ण दिवसभर विश्रांती दिली जाते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बैलपोळा दहा ओळींचा निबंध

१. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. २. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो . ३. अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. ४. बैल शेतकऱ्यासाठी राबतो. शेतकरीसुद्धा बैलाला खूप जपतो. राबराब ५. ग्रामीण भागात सर्जा राजा, ढवळ्या पवळ्या अशा नावाने बैल जोड्या प्रसिद्ध असतात. ६. बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. ७. यादिवशी बैलाच्या अंगावर रंगीत नक्षी काढली जाते. पाठीवर रंगीबेरंगी झुल चढवतात. ८. गावातील सर्व बैल सजवून त्यांची वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढली जाते. ९. घरोघरी सुवासिनी बैलांची पूजा करतात. त्यांना ओवाळतात तसेच पुरणपोळीचा सुग्रास नैवद्य बैलांना भरवतात. १०. प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करावे हा संदेश बैलपोळा सण देतो. मला हा सण खूप आवडतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बैल पोळा मराठी दहा ओळींचा निबंध

१. पोळा हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा उत्सव आहे.

२. हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो.

३. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

४. बैल हे शेतीचे महत्त्वाचे साधन आणि शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो.

५. पोळ्याच्या दिवशी बैलांना कामातून पूर्णपणे विश्रांती दिली जाते.

६. बैलाला स्वच्छ धुवून, शिंगांना रंग लावून आणि विविध वस्तूंनी सजवले जाते.

७. गळ्यात नवीन घुंगरूंच्या माळा आणि पाठीवर आकर्षक झूल टाकली जाते.

८. या दिवशी बैलांना पुरणपोळी आणि इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दिला जातो.

९. सजवलेल्या बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.

१०. हा सण शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते आणि प्रेम दर्शवतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

अं.क्र.निबंधाचे नाववाचन लिंक
1.माझा आवडता पक्षी मोरक्लिक करा 
2.माझा आवडता प्राणी कुत्राक्लिक करा
3.माझा आवडता प्राणी ससाक्लिक करा
4.माझा आवडता सण होळीक्लिक करा
5.माझा आवडता सण दिवाळीक्लिक करा
6.माझा आवडता सण बैलपोळाक्लिक करा
7.माझी शाळाक्लिक करा
8.माझी आईक्लिक करा
9.जंगल तोड एक समस्याक्लिक करा
10.माझा आवडता छंदक्लिक करा
11.विज्ञानाचे चमत्कारक्लिक करा
12.मातृभाषेचे ऋणक्लिक करा
13.झाडे नसती तरक्लिक करा
14.माझा आवडता खेळक्लिक करा
15.माझी आईक्लिक करा
16. क्लिक करा
17. क्लिक करा
18. क्लिक करा
19. क्लिक करा
20. क्लिक करा
21. क्लिक करा
22. क्लिक करा
23. क्लिक करा
24. क्लिक करा
25. क्लिक करा
26. क्लिक करा
27. क्लिक करा
28. क्लिक करा
29. क्लिक करा
30. क्लिक करा
31. क्लिक करा
32. क्लिक करा
33. क्लिक करा
34. क्लिक करा
35. क्लिक करा
36. क्लिक करा
37. क्लिक करा
38. क्लिक करा
39. क्लिक करा
40. क्लिक करा
41. क्लिक करा
42. क्लिक करा
43. क्लिक करा
44. क्लिक करा
45. क्लिक करा
46. क्लिक करा
47. क्लिक करा
48. क्लिक करा
49. क्लिक करा
50. क्लिक करा
51. क्लिक करा
52. क्लिक करा
53. क्लिक करा
54. क्लिक करा
55. क्लिक करा
56. क्लिक करा
57. क्लिक करा
58. क्लिक करा
59. क्लिक करा
60. क्लिक करा
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment