वाघोबा व ससुल्या tiger and rabbit moral stories

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाघोबा व ससुल्या tiger and rabbit moral stories वाघोबा ठराविक वेळेत जातो व येतो. हे एका छोट्या व धिटूकल्या सशास माहित होते. त्याने एक दिवस वाघोबाची गंमत करायचे ठरवले. वाघोबा नदीवर पाणी प्यायला गेला होता. तेंव्हा ससोबा हळूच त्याच्या घरात येऊन गुपचूप बसला. त्याने जाळीचे दार आतून लाऊन घेतले होते. वाघोबा घरी परत आला. घराचे दार बंदपाहून त्याला गंमत वाटली. त्याने दार टकटक वाजवले आणि “कोण आहे घरात? असे विचारले. आतून ससोबा म्हणाले. “मी आहे ससुल्या गडी डूल डूल डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन.” बापरे ! डोळे फोडले तर मला दिसणार कसे? वाघोबा घाबरून पळतच सुटला. पळता पळता वाटेत त्याला हत्ती भेटला. हत्तीने विचारले काय रे बाबा का एवढा पळतोस ? झाल काय तुला ? अरे बाबा माझ्या घरात कोण बसलंय कोण जाने ! पण मला म्हणाला, तुझे डोळे फोडीन. हत्ती हसायला लागला. चल मी येतो तुझ्या घरी. हत्तीने दारावर टकटक केले, आणि विचारले कोण आहे वाघोबाच्या घरात ? ससुल्या म्हणाला, “आहे ससुल्या गडी, डूल डूल डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन, हत्तीची सोंडच कापीन !” हत्ती पण घाबरला म्हणाला, अरे माझी सोंड तुटली तर मी पाणी कसे पिणार ? अंघोळ कशी करणार ? हत्ती आणि वाघोबा पळत सुटले. पळता पळतावाटेत अस्वल भेटलं, अस्वलाने विचारले कारे पळता ? हत्ती म्हणाला ” अरे वाघोबाच्या घरात कोण बसलंय कुणास ठाऊक ! पण म्हणतंय मी वाघोबाचे डोळे फोडीन, हत्तीची सोंड कापीन म्हणून आम्ही पळतोय. ” अस्वल म्हणाले चल मी बघतोय कोण आहे ते” अस्वल, हत्ती, वाघोबा सगळे घरी आले. अस्वलाने दार वाजवले. टक टक टक कोण आहे रे घरात ? ससुल्या म्हणाला. ” मी आहे ससुल्या गडी, डूल डूल डुलक्या मारी. वाघोबाचे डोळेच फोडीन, हत्तीची सोंडच कापीन, अस्वलाचे केसच उपटीन.” असे ऐकल्यावर अस्वल पळत सुटले वाटेत भेटला उंट दादा. त्याने पण का पळता म्हणून विचारले. अस्वलाने घाबरत घाबरत सर्व सांगितले. ‘थांबा बघतोच मी कोण आहे ते ‘उंटाने दार वाजवले कोण आहे रे घरात ? ससुल्या म्हणाला . ” मी आहे ससुल्या गडी, डूल डूल डुलक्या मारी वाघोबाचे डोळेच फोडीन, हत्तीची सोंडच कापीन अस्वलाचे केसच उपटीन, उंटाची मानच मोडीन. उंट पण घाबरला सगळे पळायला लागले. वाटेत भेटला कोल्होबा. कोल्होबाला सर्व हकीकत सांगितली चला मी बघतो त्याचीच फजिती. कोल्होबाने दार वाजवले. ससुल्या म्हणाला. ” वाघोबाचे डोळेच फोडीन, हत्तीची सोंडच कापीन, अस्वलाचे केसच उपटीन, उंटाची मान मोडीन, कोल्होबाची शेपूटच तोडीन, कोल्होबा घाबरले नाहीत. बर का ते म्हणाले. अस होय, तर मंग मी ससुल्याचे कानाच उपटीन, हे ऐकल्यावर ससुल्या घाबरला व मांगाच्या दारातून पळून गेला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा