हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories  आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसऱ्या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, ‘माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.’

तात्पर्य : – आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा